नेपच्यून १९ सप्टेंबर

आपल्या सूर्यमालेतील सर्वात शेवटचा ग्रह नेपच्यून हा १९ सप्टेंबर रोजी पृथ्वीच्या जवळ येणार आहे. या दिवशी हा ग्रह अगदी सूर्यासमोर राहिल. याला खगोल शास्त्रात प्रतियूती असे म्हणतात. प्रतियूती काळात पृथ्वीपासून ग्रहाचे अंतर सरासरी कमी असते. या काळात पृथ्वीवरून ग्रहाचे निरीक्षण अगदी चांगल्या प्रकारे करता येते.
सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी नेपच्यूनला १६५ वर्ष लागतात. व स्वतःभोवती एक फेरी तो १६ तासात पूर्ण करतो. या ग्रहाचा शोध १३ सप्टेंबर १८४६ मध्ये जर्मन वैज्ञानिक गॅले आणि लव्हेरिया यांनी लावला. या ग्रहाला १३ चंद्र आहे. या ग्रहाच्या वातावरणात मिथेन असल्याने हा ग्रह निळा दिसतो. या ग्रहाचा व्यास ४८,६०० कि.मी. आहे. या ग्रहाच्या पृष्ठभागाचे तापमान उणे २१४ अंश सेल्सीयस आहे. २४ ऑगस्ट १९८९ रोजी व्हायेजर - २ हे मानवरहित यान नेपच्यून जवळून गेले होते. सूर्यापासून या ग्रहाचे अंतर ४५२ कोटी किमी आहे. किंवा ३०.१ खगोलीय एकक आहे. या खगोलीय घटनेचा मानवी जीवनावर कोणताही वाईट परिणाम होणार नाही. दुर्बिनीतून या ग्रहाचे निरीक्षण केले असता. फिक्कट निळ्या रंगाचा हा ग्रह दिसतो.
१९ सप्टेंबर रोजी हा ग्रह सायंकाळी पूर्व क्षितीजावर उगवेल व पहाटे पश्चिमेकडे मावळेल. हा ग्रह रात्रभर आकाशात दिसेल. हा ग्रह साध्या डोळ्यांनी दिसू शकणार नाही. याकरिता शक्तीशाली दुर्बिनीची आवश्यकता आहे. याआधी हा ग्रह १६ सप्टेंबर २०१२ रोजी पृथ्वीच्या जवळ आला होता.
अशी माहिती मराठी विज्ञान परिषद, अमरावती विभागाचे अध्यक्ष प्रविण श. गुल्हाने व हौशी
खगोल अभ्यासक विजय म. गिरुळकर यांनी दिली आहे. या घटनेविषयी अधिक माहिती करिता हौशी खगोल अभ्यासक, एस. आर. पी. कॅम्प अमरावती. मो. ९६३७३८४८१२ .

Comments

Popular posts from this blog

चंद्रयान याचा पृथ्वीशी संपर्क कसा होतो