21&22 आक्टो़बर

आपल्या देशात नवरात्रौत्सवातील विविध रंग जनमानसात वेगवेगळे रंग भरुन मानवी जीवाला नव्या उत्साहात दंग करुन जातात. अशातच आकाशातही शनिवार २१ व रविवार २२ ऑक्टोबरला मृग नक्षत्रातून रंगीबेरंगी उल्कांची उधळण होणार आहे.
आकाशात क्षणार्धात चमकणारी प्रकाशरेखा जिला काही लोक तारा तुटला असे म्हणतात परंतु ती उल्का असते. आकाशात रोज रात्री वेगवेगळ्या भागात कमी अधिक प्रमाणात उल्का पडत असतात, पण पृथ्वी कक्षा आणि उल्कांची कक्षा निश्चित असल्याने वर्षातील ठराविक वेळी ठराविक तारका समूहातून उल्कांचा वर्षाव अनुभवता येतो. आपल्या सूर्य कुलाचेच घटक असलेले धुमकेतू सूर्य प्रदक्षिणा पूर्ण करतांना काही वस्तूकण भ्रमण मार्गावर सोडून जातात व पृथ्वी ज्यावेळी यांच्या जवळून जातांना असे वा इतर लहानमोठ्या वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे ओढले जातात आणि वातावरणातील घर्षणामुळे पेट घेतात. याच विविधरंगी प्रकाशरेखा आपण नुसत्या डोळ्यांनी पाहता येतात. २१ व रविवार २२ ऑक्टोबरला आकाश प्रेमींनी हा नजारा अनुभवावा.

Comments

Popular posts from this blog

चंद्रयान याचा पृथ्वीशी संपर्क कसा होतो